For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपच्या संघटनरचनेत बदल; शिवप्रकाशांकडे गोवा, सतीश धोंड यांची महाराष्ट्रात नियुक्ती

05:52 PM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
भाजपच्या संघटनरचनेत बदल  शिवप्रकाशांकडे गोवा  सतीश धोंड यांची महाराष्ट्रात नियुक्ती
Advertisement

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी 24 नव्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या असून, या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.

Advertisement

या फेरबदलात राष्ट्रीय सह-महासचिव (संघटन) शिवप्रकाश यांच्याकडे आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा या पाच राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांचे कार्यकेंद्र मुंबई असेल. यापूर्वी त्यांच्या कार्यक्षेत्रात तेलंगणा आणि पश्चिम बंगालचा समावेश होता.

महाराष्ट्र भाजपच्या संघटनात्मक रचनेतही बदल करण्यात आला आहे. अजय जामवाल यांची प्रदेश महासचिव (संघटन) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, सतीश धोंड यांच्याकडे प्रदेश सह-महासचिव (संघटन) पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील ‘जनजाती संपर्क’ उपक्रमाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. त्यांचे कार्यकेंद्र नागपूर असेल.

Advertisement

भाजपने याशिवाय विविध राज्यांमध्ये संघटनात्मक पदांवर नियुक्त्या केल्या आहेत. या बदलांमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक व्यवस्थेत नव्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.

Advertisement
Tags :

.