कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिवकुमारांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

11:58 AM Oct 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची होती ऑफर : पक्षनिष्ठेसाठी निवडला तुरुंगवासाचा पर्याय

Advertisement

बेंगळूर : राज्य काँग्रेस गोटात अलीकडे घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे तीव्र कुतूहल निर्माण झाले आहे. मंत्रिमंडळ पुनर्रचना, नेतृत्त्व बदलाच्या मुद्द्यांमुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. निजद-काँग्रेस युतीचे सरकार असताना भाजपकडून मला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर मिळाली होती. मात्र, मी पक्षनिष्ठेसाठी तुरुंगवासाचा पर्याय निवडला, असे शिवकुमार यांनी सांगितले. त्यामुळे खळबळ माजली आहे.

Advertisement

बेंगळूरमधील एफकेसीसीआयच्या सभागृहात के. एम. रघु यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर ते म्हणाले, युतीचे सरकार कोसळत असताना पक्षनिष्ठेसाठी उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर धुडकावून कारावासाचा पर्याय निवडला. युतीचे सरकार असताना दहा आमदार राजीनामा देण्यासाठी निघाले होते. तेव्हा मी कनकपूरवरून बेंगळूरला येऊन पाच-सहा आमदारांना परत आणले. तेव्हा मला एका प्राप्तिकर ऑडिटरचा फोन आला. तेव्हा माझ्यासोबत डी. के. सुरेश होते. फोनवरून मला तुम्ही उपमुख्यमंत्री बनणार की तुरुंगवासात जाणार, अशी विचारणा करण्यात आली. सर्व आमदारांना सोबत घेऊन या, असा पर्याय माझ्यासमोर ठेवण्यात आला होता.

दुसरा पर्याय निवडला असता तर...

तेव्हा फोन केलेल्यांना मी इतकी सर्व पदे दिलेला पक्ष सोडणार नाही. हवे तर तुरुंगवासात जाईन. मी विद्यार्थी नेता असताना राजीव गांधी यांनी मला तिकीट देऊन मंत्री बनविले. बंगारप्पा यांनी सहकार्य केले. या पक्षातूनच एवढ्या उंचीपर्यंत पोहोचलो आहे, असे सांगून कारावासाचा पर्याय निवडला. तेव्हा मी दुसरा पर्याय निवडला असता तर काय झाले असते माहीत नाही, असे शिवकुमार यांनी सांगितले.

शालेय निवडणुकीतच मला अनेक दबावांनी विविध पदे मिळाली. विद्यार्थीदशेत असतानाच मला राजकारणात येण्याची महत्वाकांक्षा होती. पदवीच्या अंतिम वर्षात असतानाच मला निवडणुकीचे तिकीट मिळाले. यावर विश्वास ठेवणेही अनेकांना कठीण होते. तेव्हापासून आतापर्यंत आठ वेळा मी आमदार म्हणून निवडून आलो आहे. आता उपमुख्यमंत्री बनलो. सध्या राजकारणात असलेल्यांना काही प्रमाणात मार्गदर्शन करू शकतो. कारण मला राजीव गांधी यांच्या विचारधारेवर अधिक विश्वास आहे. नेत्यांच्या मागे धावणारे निर्माण करू नका, नेते घडवा, या मतावर माझा अधिक विश्वास आहे, असेही शिवकुमार म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article