काँग्रेस अध्यक्षांसमवेत शिवकुमारांची दिल्लीवारी
राजकीय वर्तुळात तीव्र उत्सुकतेसह व्यापक चर्चा
प्रतिनिधी/ बेंगळूर
हायकमांडवर मला विश्वास आहे. संधी मिळाल्यास पुढील दोन्ही अर्थसंकल्प सादर करू असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र उत्सुकता आणि व्यापक चर्चा सुरू झाली आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूर विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांच्या पायाभरणी आणि उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर शिवकुमार तेथून थेट एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत एका खास विमानाने दिल्लीला गेले. डी. के. शिवकुमार एका खासगी कार्यक्रमासाठी दिल्लीला जात असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे.
सिद्धरामय्यांना अर्थसंकल्प सादर करण्याची परवानगी देऊ नये. आपणालाच अर्थसंकल्प सादर करण्याची अनुमती द्यावी, यासाठी शिवकुमार डिसेंबरमध्ये आग्रही होते. पण हायकमांडने डी. के. शिवकुमार यांच्या आग्रहापुढे झुकले नाही. अपेक्षेप्रमाणे, सिद्धरामय्यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. किमान आता तरी सिद्धरामय्या यांनी सत्ता सोडावी. हायकमांडने या संदर्भात विशिष्ट सूचना द्याव्यात, असे प्रतिपादन डी. के. शिवकुमार यांनी केले आहेत. हायकमांडने सत्ता सोडा म्हटले तर सोडेन, पदावर कायम राहण्यास सांगितले तर राहीन. सर्वकाही हायकमांडने ठरविले पाहिजे, असे सिद्धरामय्या वारंवार म्हणत आहेत. सत्तावाटपाचा निर्णय राज्य पातळीवर घेता येत नाही. ते दिल्लीतच विशेषत: हायकमांडच्या उपस्थितीत ठरवावे लागेल. त्यामुळे, डी. के. शिवकुमार यांनी हायकमांडवर दबाव आणण्यासाठी विविध प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
आतापर्यंत राहुल गांधींनी डी. के. शिवकुमार यांना भेटण्यास वेळ दिलेला नाही. जर राहुल गांधींनी सांगितले तर नेतृत्व सोडेन, असे सिद्धरामय्या वारंवार सांगित ओत. परंतु राहुल गांधींनी सिद्धरामय्यांना अद्याप कोणतेही निर्देश देण्याची चिन्हे नाहीत.