For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : शिवाजी विद्यापीठात ‘शिवस्पंदन’ सांस्कृतिक महोत्सवाला दिमाखदार प्रारंभ

01:42 PM Jan 07, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur   शिवाजी विद्यापीठात ‘शिवस्पंदन’ सांस्कृतिक महोत्सवाला दिमाखदार प्रारंभ
Advertisement

                  शोभायात्रेतून शिवस्पंदन महोत्सवाची उत्साहात सुरुवात

Advertisement

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या बतीने आयोजित तीन दिवसीय शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाला मंगळवारी रोजी दिमाखदार शोभायात्रेने उत्साही बातावरणात प्रारंभ झाला. महोत्सवात विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.

प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात झाले. शोभायात्रेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज,, शाहू महाराज, फुले दाम्पत्य, अभिनेते राज कपूरच्या वेशभूषेने भरला रंग छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्यासह राज कपूर, नर्गीस, दादा कोंडके, उषा चव्हाण, व्ही. शांताराम, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सीमी गरेवाल आदी कलाकारांच्या व्यक्तीरेखाही विद्यापीठाच्या प्रांगणात अवतरल्या. त्याखेरीज सहभागी अधिविभागांच्या संघांनी अतिशय कल्पकतेने विषयांचे सादरीकरण शोभायात्रेद्वारे केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.