For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवानंद निलण्णावरची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी

06:45 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
शिवानंद निलण्णावरची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी
Advertisement

न्यायालयीन कोठडीत रवानगी

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : बहुचर्चित शिवम असोसिएट्सचा सर्वेसर्वा शिवानंद सिद्धाप्पा निलण्णावर याला ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंगळूर येथील तिसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असून न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Advertisement

ईडीच्या अधिकाऱ्यांनी 2 हजार 110 कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार व फसवणूक प्रकरणी 13 ऑगस्ट रोजी बेळगाव येथे शिवानंद निलण्णावरला अटक करून त्याला चौकशीसाठी मंगळूरला नेले होते. बारा दिवस ईडीने त्याला आपल्या कोठडीत घेतले होते. कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी पूर्ण करून शिवानंदला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर शिवानंदच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. सीआयडीनंतर आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिवम असोसिएट्सच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली असून मंगळूर उपविभागाच्या कार्यालयात त्याची कसून चौकशी करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.