महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शिवम दुबेचे जलद अर्धशतक

06:04 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बंगालविरुद्ध मुंबईच्या 6 बाद 330 धावा

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

भारताचा टी-20 स्पेशालिस्ट मानल्या जाणाऱ्या शिवम दुबेने आपला फॉर्म रणजी सामन्यातही कायम राखला असून येथील ईडन गार्डन्सवर सुरू झालेल्या गट ब मधील रणजी करंडक सामन्यात त्याने नोंदवलेल्या आक्रमक अर्धशतकांमुळे मुंबईला बंगालविरुद्ध पहिल्या दिवशी 6 बाद 330 धावांची मजल मारता आली.

अफगाणविरुद्धच्या टी-20 मालिकेत चमक दाखविल्यानंतर रणजीमधील पहिल्या सामन्यात शतक नोंदवल्यानंतर शिवम दुबेने येथील सामन्यान 73 चेंडूत 72 धावा फटकावल्या. त्यात 12 चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. जखमी अजिंक्य रहाणेच्या गैरहजेरीत नेतृत्व करणाऱ्या दुबेने प्रारंभी चौकारांवर अधिक भर दिला होता. त्याला सूर्यांश शेडगेने 76 चेंडूत 71 धावा फटकावत चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी 144 धावांची भागीदारी केली. ही जोडी बाद झाल्यानंतर तनुष कोटियन (73 चेंडूत नाबाद 55) व अथर्व अंकोलेकर (78 चेंडूत नाबाद 41) यांनी आक्रमक खेळ पुढे चालू ठेवत सातव्या गड्यासाठी 147 चेंडूत 99 धावांची अभेद्य भागीदारी केली.

तत्पूर्वी, दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या पृथ्वी शॉने 42 चेंडूत जलद 35 धावा केल्या. त्याचा सलामीचा जोडीदार भूपेन लालवाणी 18 धावा काढून बाद झाला. सुरज जैस्वाल हा बंगालचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 95 धावांत 3 गडी बाद केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article