For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवकुमारांच्या आजच्या दिल्ली दौऱ्यामुळे कुतूहल

06:36 AM Dec 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
शिवकुमारांच्या आजच्या दिल्ली दौऱ्यामुळे कुतूहल
Advertisement

हायकमांडची भेट घेण्याची शक्यता

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

सत्ताधारी काँग्रेसमधील सत्तावाटपाचा वाद अद्याप शांत झालेला नाही. मंत्री आणि आमदार जाहीर विधाने करत असताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार सोमवारी दिल्लीला जात असल्याने कुतूहल निर्माण झाले आहे. या भेटीदरम्यान डी. के. शिवकुमार हायकमांडला भेटण्याची शक्मयता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Advertisement

बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनातही मंत्री आणि नेत्यांनी सत्तावाटपावर जाहीर विधाने केल्याने पक्षात गोंधळ निर्माण झाला होता. अधिवेशनात उत्तर कर्नाटकवरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री उत्तर देत असताना हायकमांड माझ्या बाजूने आहे. मीच मुख्यमंत्री म्हणून कायम राहीन. सत्तावाटपावर कोणताही करार झालेला नाही, असे  त्यांनी स्पष्ट केले होते. या घडामोडींदरम्यान, डी. के. शिवकुमार सोमवारी दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. राज्याच्या पाणी प्रश्नासंदर्भासह अंमलबजावणी संचालनालयाने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात शिवकुमारांना समन्स बजावले आहे. या पार्श्वभूमीवर ते दिल्लीला जात आहेत, असे सांगितले जात आहे. तथापि, या दौऱ्यात ते पक्षाच्या वरिष्ठांना भेटण्याची शक्मयता आहे.

रविवारी बेंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले की, मी सोमवारी दिल्लीला जात आहेत. राज्याच्या म्हादई प्रकल्पाबाबत दिल्लीत जलशक्ती मंत्र्यांची भेट घेत आहे. केंद्रीय वनमंत्र्यांनाही भेटणार आहे. मेकेदाटू प्रकल्पावर काम करण्याची तयारी सुरू आहे. राज्यात सत्ता वाटपाच्या मुद्द्यावर कोणताही गोंधळ नाही. सर्व काही प्रसारमाध्यमांची निर्मिती आहे. आपण सर्वजण एक आहोत, असे असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.