शिवाजीराव पाटील यांचा हुनगिनहाळ येथील मतदारांच्या संपर्क दौऱ्याला - जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चंदगड :
मागील निवडणुकीत शिवाजीराव पाटील यांना अगदी थोड्या मतांनी मतदारांनी हुलकावणी दिली होती. गेल्या पाच वर्षात केलेली विकास कामे, महिला भगिनींची साथ, युवक, शेतकरी, जवान यांच्या पाठबळावर यावेळी निश्चित विजय मिळवू आणि या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून दाखवू असा विश्वास मतदारांपुढे बोलताना व्यक्त केला.
यावेळी पाण्याची टाकी हे चिन्ह मिळाले असल्याने हे मी माझे भाग्य समजतो. आता मतदारांच्या घराघरात जावून माय भगिनींना आणि वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घेणार असल्याचे स्पष्ट करीत त्या दृष्टीकोनातून प्रचार यंत्रणा काम करीत असल्याचे शिवाजी पाटील म्हणाले .
.त्या दृष्टीकोनातून माझी प्रचार यंत्रणा जोमाने काम करीत आहे आणि मी या निवडणुकीत निश्चित विजयी होणार असल्याचं विश्वास त्यांनी हुनगिनहाळ गावातील मतदारांसमोर बोलताना व्यक्त केला तसेच बूथ लेव्हलला मी व माझे सहकारी कार्यकर्ते नेते मंडळी जोमाने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सर्वश्री भीमा कांबळे ,जयवंत कांबळे ,चंदू कांबळे, प्रकाश कांबळे ,मारुती कांबळे, मारुती पवार ,नामदेव मुरुटे ,अमृत कांबळे, रामगौडा कांबळे, विजय कांबळे, कौतुक गुंडली, महांतेश कांबळे, ऋत्विक कांबळे, पवन कांबळे, राजू कांबळे ,आदी मान्यवर उपस्थित होते.