Shivaji University News: शिवाजी विद्यापीठाच्या पोर्चमध्ये 'झुणका भाकर' आंदोलन
तीन महिन्यांपासून मेसमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण - विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी बेट खेळ
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील मेसमध्ये विद्यार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. जेवणामध्ये साबणाचे तुकडे, घासण्याचे तुकडे, किडे, आळ्या आढळणे ही गंभीर बाब प्रशासनाच्या निदर्शनास वारंवार आणून देण्यात आली होती.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी बेट खेळ करणारा हा प्रकार असूनही विद्यापीठ प्रशासनाने ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे रविवारी रात्री उशिरा शाहू सेनेने विद्यार्थ्यांसह झुणका भाकर आंदोलन केले.
यावेळी शाहू सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी, करण कवठेकर, अजय शिंगे, विवेक पोर्लेकर, अभिषेक परकाळे, सिद्धांत गणगे, हर्षवर्धन पाटील, ओमकार कुंभार, शुभम जाधव, कुणाल पांढरे, ऋतुराज पाटील, सूरज पाटील आदी उपस्थित होते.