For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बड्या पगाराच्या नोकरीसाठी विद्यार्थी शिकताहेत विदेशी भाषा!

03:19 PM Jun 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
बड्या पगाराच्या नोकरीसाठी विद्यार्थी शिकताहेत विदेशी भाषा
Shivaji University S
Advertisement

इंजिनिअर, मेडीकलमधील ज्ञानाबरोबर विदेशी भाषेची जोड असल्यास मिळतय लाखोंचे पॅकेज; विदेशी भाषेचे शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा

अहिल्या परकाळे कोल्हापूर

भल्या मोठया पगाराची नोकरी मिळावी म्हणून मेडीकल, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. हे खरे असले तरी टॉप टेनमध्ये येवून लाखो रूपयांचे पॅकेज मिळवण्यासाठी मेडीकल, इंजिनिअरिंगच्या शिक्षणाबरोबर जापनीज, रसियन, स्पॅनिश आदी विदेशी भाषांचे शिक्षण घ्यावे लागते. इंजिनिअरिंगमधील कौशल्याबरोबर विदेशी भाषांची जोड असेल तर परदेशी कंपन्या ‘मुह मांगे’ पॅकेज देतात. त्यामुळे अनेक मेडीकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी विदेशी भाषांचे शिक्षण घेत आहेत. ऐवढेच नव्हे तर काही मेडीकल व इंजिनिअरिंग कॉलेजनी विदेशी भाषा अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्टीत शिक्षण दिले जात आहे.

Advertisement

अकरावी-बारावी सायन्सनंतर किंवा दहावीनंतर तीन वर्षे पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतल्यानंतर मेडीकल, इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला जातो. मेडीकल व इंजिनिअरिंग करायचे म्हंटले की फक्त इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असले पाहिजे हे खरे आहे. सुरूवातीच्या काळात मेडीकल व इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या फारच कमी होती. मध्यंतरी ती संख्या झापाट्याने वाढल्याने नोकरींच्या संधीपेक्षा कमी झाल्या. परिणामी अनेक विद्यार्थी बेरोजगार झाले. परंतू आता कोणत्याही इंजिनिअरिंग व मेडीकलच्या विद्यार्थ्याला दोन ते तीन विदेशी भाषा येत असतील तर परदेशी कंपन्या लाखो रूपयांचे पॅकेज देत आहेत. विद्यार्थी हित लक्षात घेवून शिवाजी विद्यापीठातही विदेशी भाषा विभाग सुरू केला. अलीकडे विदेशी भाषेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. यामध्ये जास्तीत जास्त मेडीकल, इंजिनिअरिंगसह व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परदेशी कंपन्यांकडून लाखोचे पॅकेज मिळवण्यासाठी इंजिनिअरिंगचे विद्यार्थी विदेशी भाषेचे शिक्षण घेत आहेत.

अध्यापनाचे काम करण्यासाठी किंवा परदेशी जावून संशोधन करण्यासाठी विदेशी भाषेचे शिक्षण घ्यावे लागते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून चालत नाही तर ज्या देशात जाणार तेथील बोलीभाषाही आली पाहिजे. जेणेकरून विदेशात गेल्यानंतर संशोधन किंवा शिक्षणासह नोकरी करणेही सहज सोपे होईल. यासाठी विदेशी भाषा शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. विद्यार्थ्यांचा कल पाहून अनेक मेडीकल, इंजिनिअरिंग कॉलेजनी विदेशी भाषा अभ्यासक्रम सुरू केला आहे. आपल्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम पूर्णपणे मोफत शिकवला जातो. त्याचबरोबर कोल्हापूर शहरात खासगी संस्थांनी विदेशी भाषा प्रशिक्षण वर्गही सुरू केले आहेत. खासगी संस्था विदेशी भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी हजारो रूपये शुल्कही आकारतात. तरीही विद्यार्थी विदेशी भाषेचे शिक्षण घेवून नोकरीच्या संधी शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मेडीकल व इंजिनिअरिंगच्या जोडीला विदेशी भाषेची जोड असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना परदेशी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे.

Advertisement

विदेशी भाषा शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ
युवकांना अनेक क्षेत्रात विदेशी भाषेचा उपयोग होत आहे. विदेशी भाषेचे शिक्षण घेणाऱ्यांना औद्योगिक, हॉटेल, पर्यटन, कार्पोरेट, दुतावास अशा विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळतात. मूळ शिक्षणाबरोबर विदेशी भाषेचे शिक्षण घेतल्यास व्यक्तीमत्व विकास होतो. त्यामुळेच विदेशी भाषेचे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
डॉ. मेघा पानसरे (विभागप्रमुख, विदेशी भाषा विभाग, शिवाजी विद्यापीठ)

Advertisement
Tags :

.