शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत नामविस्तारला तीव्र विरोध
चर्चेविना स्थगन प्रस्ताव स्वीकारला
सद्यस्यांची घोषणाबाजी: प्रशासन, कुलगुरू व सद्यस्यामध्ये जोरदार खडाजंगी, निषेधाचे फलक झळकावले
कोल्हापूर:
गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा धुरळा उडालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा शनिवारी झालेल्या अधिसभेच्या बैठकीतही प्रचंड गाजला. या नामविस्ताराला कडाडून विरोध करत, सद्यस्य अभिषेक मिठारी यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव प्रशासनाला चर्चेविना स्विकारावा लागला. यावरून प्रशासन, कुलगुरू व सदस्य यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सदस्य अभिषेक मिठारी व श्वेता परूळेकर यांनी निषेधाचे फलक झळकावले.
सभेला सुरुवातीलाच अभिषेक मिठारी यांनी नामविस्ताराला विरोध करणारा स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र, हा विषय संवेदनशील असल्याने त्यावर चर्चा करण्यास सभेचे अध्यक्ष तथा कुलगुरू यांनी नकार दिला. परिणामी, सद्यस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली