विद्यापीठ मार्च-एप्रिल परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तारखा उपलब्ध
23 जानेवारीपासून परीक्षा अर्ज भरण्यास प्रारंभ
कोल्हापूर प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष 2023-24 मार्च-एप्रिल उन्हाळी सत्रातील परीक्षा अर्ज भरण्याचे व परीक्षांचे वेळापत्रक शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. 23 जानेवारीपासून परीक्षा अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. तर काही पारंपारिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 31 मार्च व उर्वरीत अभ्यासक्रमांच्या 28 एप्रिलपासून परीक्षा सुरू होणार आहेत. तरी अधिविभाग व महाविद्यालयांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन शिवाजी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत पदवी व पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात अथवा अधिविभागात विनाविलंब शुल्कासह 23 जानेवारी ते 7 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा अर्ज भरावयाचा आहे. विलंब शुल्कासह 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान तर अतिविलंब शुल्कासह 15 ते 20 फेब्रुवारी दरम्यान परीक्षा अर्ज भरावयाचा आहे. महाविद्यालय व अधिविभागांनी विनाविलंब शुल्कासह 8 फेब्रुवारी. विलंब शुल्कासह 14 फेब्रुवारी आणि अतिविलंब शुल्कासह 21 फेब्रुवारीला परीक्षा अर्ज अॅप्रुव्ह करावयाचा आहे. सर्व परीक्षा अर्जांच्या याद्या विद्यापीठात विनाविलंब शुल्कासह 12 फेब्रुवारी, विलंब शुल्कासह 16 फेब्रुवारी, अतिविलंब शुल्कासह 23 फेब्रुवारीपर्यंत सादर करावयाच्या आहेत. महाविद्यालयाकडे परीक्षा अर्ज जमा होताच त्याच दिवशी परीक्षा अर्ज ऑनलाईन अॅप्रुव्ह करावेत. अंतिम दिवसाची वाट पाहू नये, अशा सूचना महाविद्यायांना शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने दिल्या आहेत.