Kolhapur News : कुलगुरु, प्र-कुलगुरुंमुळे शिवाजी विद्यापीठ जागतिक स्तरावर : डॉ. माणिकराव साळुंखे
कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील यांना सहृदय निरोप
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आपल्या कार्यकाळात उत्तम प्रशासकीय कौशल्याने शिवाजी विद्यापीठाला शैक्षणिक व संशोधकीय दिशा देऊन जागतिक स्तारावर नाव लौकिक मिळवून दिला आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील पाच वर्षांचा कार्यकाळ सोमवारी पूर्ण झाला. शिवाजी विद्यापीठाच्यावतीने आयोजित गौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांसह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. डॉ. साळुंखे यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील सपत्नीक गौरव करून निरोप देण्यात आला.
डॉ. साळुंखे म्हणाले, उत्तम शिक्षक, संशोधक आणि समाजाभिमुख प्रशासक यांचा वस्तुपाठ म्हणजे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची कारकीर्द आहे. जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ असलेल्या प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांची लाभलेली साथ मौल्यवान आहे. यातूनच शिवाजी विद्यापीठानें अनेक शिखरे सर केली आहेत. डॉ. शिर्के आणि डॉ. पाटील यांनी काम करताना समन्वय वृत्ती व समंजस्यपणाचे दर्शन घडविले आहे.
विद्यापीठाप्रती असलेल्या सर्वोच्च निष्ठेमुळेच आपल्या कार्यकाळात त्यांनी उत्कृष्ट सेवा प्रदान केली आहे. डॉ. शिर्के यांनी विद्यापीठात वादविवाद टाळून संवादावर भर देत सौहार्दपूर्ण वातावरण निर्मिती करण्यावर भर दिला. त्यांच्या प्रशासकीय कामकाजातील यशामध्ये संख्याशास्त्राचा वाटा मोठा आहे.
डॉ. पाटील यांनी देशातल्या एका कोपऱ्यातील विद्यापीठामधून जागतिक दर्जाचे संशोधन होऊ शकते, हे आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले. तथापि, आजही आपल्या देशाचा संशोधन व विकासावरील गुंतवणुकीचा वाटा अत्यल्प
आहे. देशाला महासत्ता बनविण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि संशोधन व विकास यांवरील गुंतवणुकीत मोठी बाढ करण्याची आवश्यकता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, वसतिगृह अधीक्षक म्हणून काम पाहिले असले तरी तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्यामुळे कुलसचिव म्हणून सर्वप्रथम प्रशासनाच्या मुख्य प्रवाहात आलो. सर्व जबाबदाऱ्या पार
पाडत असताना डॉ. साळुंखे यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून काम केले. त्यांच्या चांगल्या बार्बीचे अनुकरण केले. हे सामूहिक कार्याचे फलित आहे.
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, गेल्या ४० वर्षांपासून माझी डॉ. शिर्के यांच्याशी मैत्री आहे. त्यांच्यासमवेत प्र-कुलगुरू म्हणून काम करीत असताना विद्यापीठाच्या विकासात योगदान देण्यासाठी ही मैत्री उपयुक्त ठरली. सर्वसमावेशकतेचे भान ठेवून काम केल्याने आणि विद्यार्थीहिताला सर्वोच्च प्राधान्य दिल्यामुळेच शिवाजी विद्यापीठाला विविध क्षेत्रांत अग्रेसर बनवू शकलो.
माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर, डॉ. भारती पाटील, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. माधुरी बाळवेकर, महेश साळुंखे, धैर्यसील यादव, डॉ. पी. एस. कांबळे, प्रा. मधुकर पाटील, डॉ. संतोष सुतार, डॉ. एस. जे. नाईक, डॉ. कृष्णा पाटील, डॉ. निशा मुडे-पवार, डॉ. संजय कुबल, डॉ. उदय पाटील, डॉ. मानसिंगराज निंबाळकर, डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. अवनीश पाटील, डॉ. प्रकाश कुंभार, डॉ. श्रीकृष्ण महाजन आणि डॉ. रघुनाथ ढमकले यांनी मनोगत व्यक्त केले.
कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नंदिनी पाटील आणि धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी आभार मानले. यावेळी डॉ. सुनिता शिर्के, डॉ. मोना पाटील, बी.एस. पाटील, सुरेंद्र जैन आदी उपस्थित होते.