For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांच्या प्रतिमा हटविल्या

07:52 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर  शिवाजी महाराजांच्या प्रतिमा हटविल्या
Advertisement

शिवप्रेमींमधून संताप, पोलिसांकडून दबाव

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे दैवत असताना कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनगोळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा हटविण्यात आली. काही कानडी भाषिक संघटनांनी आक्षेप घेतल्याने शनिवारी मध्यरात्री ही मूर्ती हटविण्यात आल्याने शिवप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे.

Advertisement

दुर्गामाता दौडच्यावेळी अनगोळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा व सिंहासन उभारण्यात आले होते. यापूर्वी केवळ मराठी दुकानांवरील फलक कन्नड संघटनांच्या डोळ्यात खुपत होते, परंतु आता छत्रपती शिवाजी महाराजांचे फलक, प्रतिमा खुपू लागल्या आहेत. या प्रतिमा काढण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनावर दबाव घालण्यात आला. शिवभक्तांचा उद्रेक होऊ नये, यासाठी मध्यरात्री या प्रतिमा हटविण्यात आल्या.

काही शिवप्रेमींनी याला आक्षेप घेतला. परंतु दबावाखाली कारवाई करण्यात आली. काही संघटनांकडून भाषिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने त्याला सडेतोड प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :

.