For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्या ओटवणेत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

05:31 PM Jun 04, 2026 IST | अनुजा कुडतरकर
उद्या ओटवणेत छ  शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
Advertisement

आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणेंची उपस्थिती

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी
ओटवणे देऊळवाडी मित्रमंडळाने साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यानिमित्त पुतळा सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

शनिवारी सकाळी प्रतिष्ठापना सोहळा

Advertisement

महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याची संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शनिवार ६ जून रोजी सकाळी ८:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पूर्णाकृती पुतळ्याची प्रतिष्ठापना विधिवत करण्यात येणार आहे. यानिमित्त रवळनाथ मंदिर ते देऊळवाडी पर्यंत शिव रॅलीही काढण्यात येणार आहे.महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पूर्णाकृती पुतळ्यामुळे ओटवणे गावातील शिवप्रेमींमध्ये समाधानाचे व उत्साहाचे वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पूर्णाकृती पुतळा अनावरण व प्रतिष्ठापना सोहळ्याला शिवप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन ओटवणे देऊळवाडी मित्रमंडळाने केले आहे.

Advertisement
Tags :

.