कडोली विभागीय क्रीडा स्पर्धेत शिवाजी हायस्कूलला सर्वसाधारण विजेतेपद
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कडोली विभागीय क्रीडा स्पर्धेत कडोलीच्या श्री शिवाजी हायस्कूलच्या खेळाडूंनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावित घवघवीत यश संपादन केले आहे. सदर स्पर्धेत मुलांच्या गटात श्रेयश उच्चुकरने 100 मी. द्वितीय, कुमार मानमोडेने 200 मी. प्रथम, किसन चौगुले 400 मी. प्रथम, सिद्धार्थ रुटकुटेने 800, 1500 व 3000 मी. प्रथम क्रमांकासह वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. मुलींच्या विभागात श्रद्धा कासरने 200 मी. द्वितीय, अंजली मानमोडेने 400 मी. तृतिय, राहिणी पाटीलने 1500 मी. प्रथम तर 800 मी. तृतिय, श्रेयशी मस्कारने 1500 मी. द्वितीय, व 4×100 मी. मध्ये प्रथम क्रमांक मिळविला. तर सांघिक खेळात खो-खो स्पर्धेत विजेतेपद, रिलेमध्ये विजेतेपद, बुद्धिबळमध्ये नैतिक राजाई विजेता तर कुस्ती स्पर्धेत रितेश कुट्रेने 60 किलो गटात द्वितीय क्रमांक पटकाविले. मुलींमध्ये खो-खो व थ्रोबॉलमध्ये विजेतेपद तर कबड्डीमध्ये उपविजेतेपद पटकाविले. या सर्व खेळाडूंना मुख्याध्यापक वर्षा पाटील, क्रीडा शिक्षक एन. आर. पाटील यांच्यासह सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे.