कोल्हापूरात आज शिवजन्मोत्सव
कोल्हापूर :
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी, 19 रोजी विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे. शिवजंयतीसाठी करवीरनगरीतील मंडळे, तालमींसह संस्था सर्व तयारीनिशी सज्ज झाल्या आहेत. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, शाहूपुरी, राजारामपुरी, आपटेनगर, बेंद्रेनगरसह गल्ली-बोळ, चौक, मंडळांनी भगव्या रिबन, पताका, झेंड्यांनी सजवल्याने शिवमय वातावरण झाले आहे. बुधवारी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी शिवाजी महाराजांचा जन्मकाळ सोहळा होणार आहे.
दरम्यान, शिवजयंतीसाठी अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांचे जथ्थेच्या जथ्थे वाहनाने शिवज्योत आणण्यासाठी पन्हाळगड, विशाळगडाकडे रवाना झाले आहेत. ते बुधवारी सकाळी गडांवर शिवज्योत प्रज्वलित कऊन धावत आणि शिवरायांचा जयजयकार करत मंडळास्थळी दाखल होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शासकीय शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. शिवरायांच्या पुतळ्dयाभोवती आकर्षक रोषणाई केली आहे. शिवाजी पेठ, निवृत्ती चौकातील शिवरायांच्या पुतळ्याभोवती रोषणाई केली आहे.
- नर्सरी बागेत शिवजयंती सोहळा
कोल्हापूरचे राजघराणे, छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे. यासाठी तुळजाभवानी मंदिरातून निघणारी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी शाही लवाजम्यासह नर्सरी बागेत दाखल होणार आहे. यावेळी राजघराण्यातील सदस्यांच्या उपस्थितीत शिवरायांचा शाही जन्मकाळ सोहळा साजरा होणार आहे.
- उभा माऊती चौकात अवतरणार शिवकाळ
शिवाजी पेठेतील शिवाजी तऊण मंडळाच्यावतीने 14 तालीम आणि शेकडो मंडळांना सोबत घेऊन शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. पेठेतील महिला एकत्र येऊन मंडळाने उभा माऊती चौकात उभारलेल्या भव्य राजमहालाच्या प्रतिकृतीमध्ये शिवाजी महाराजांचा जन्मकाळ सोहळा करणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता उभा माऊती चौकातून अश्वाऊढ शिवरायांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, मंत्री हसन मुश्रीफ, धर्म उपदेशक कालिचरण महाराज उपस्थित राहणार आहेत.
शाहूपुरी कुंभार गल्लीतील (आठवी गल्ली) धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कुंभार गल्ली शाखेतर्फे बुधवारी 19 रोजी रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. सायंकाळी 6 वाजता स्पर्धेला सुऊवात होईल. रात्री साडेआठ वाजता चित्रपटाचे सादरीकरण होईल, असे शाखे संकेत बरडे यांनी सांगितले.