For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किल्ले वैराटगडवर उद्या शिवजन्मोत्सव

05:29 PM Feb 18, 2025 IST | Radhika Patil
किल्ले वैराटगडवर उद्या शिवजन्मोत्सव
Advertisement

 कुडाळ :

Advertisement

शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने बुधवारी (ता. १९) किल्ले वैराटगड येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व संभाजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये सकाळी साडेनऊ वाजता श्री किल्ले वैराटगड व गडदेवतेचे पूजन, १० वाजता छत्रपती शिवरायांचा पाळणा, त्यानंतर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा, ध्वजवंदन व मानवंदना होणार आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्याचे निमित्ताने शिवक्रांती शिवभूषण पुरस्काराचे वितरण मान्यवरांचा उपस्थितीत करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, अमित कदम, सागर धनावडे, कापसेवाडीतील शिवदत्त मठातील महंत कवितागिरी पांचाळ, भास्कर धनावडे, मेढा नगरपंचायतीच्या नगरसेविका नीलम जवळ, सरताळेच्या सरपंच अमृता जाधव, राष्ट्रवादीच्या रूपाली भिसे यांच्यासह नवनाथ धनावडे, रोहित जगताप, प्रदीप शेलार, हणमंत लोहार, प्रदीप कदम, योगेश जंगम, नितीन पवार, अमोल खोपडे यांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती शिवक्रांती हिंदची सेना महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी स्वप्नील धनावडे शशिकांत चिकणे यांनी दिली. यावेळी दैनिक 'सकाळ'चे उपसंपादक अमोल सुतार, तरुण भारतचे मुख्य उपसंपादक राजेंद्र वारागडे, पुढारीचे प्रवीण राऊत, मॅरेथॉनपटू आनंदा जुनघरे, दुर्गसंवर्धन संस्थेमध्ये टीम वसंतगड, शिवकन्या परिवार, सैनिकांमध्ये सुरेश काकडे, अंकुश कुर्लेकर, योगेश लाड, महेश जाधव, विशाल पवार, समाजसेवक अंजली गोडसे, संजय कदम, चेतन शिंदे, सुनील शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते शिवक्रांती शिवभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष स्वप्नील धनावडे, उपाध्यक्ष प्रवीण कदम, शशिकांत चिकणे, सुधीर कांबळे, निखिल घोरपडे, जगन्नाथ शिंदे, आदित्य जाधव, कृष्णा माडले आदी मावळे उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.