'शिवा' फेम 'पूर्वा कौशिक ची भावूक पोस्ट
मुंबई
झी मराठीवरच्या 'शिवा' मालिकेतील शिवानी म्हणजेच पूर्वा कौशिक हिच्या सोशल मिडीयाच्या पोस्टमुळे सध्या चर्चेत आहे. पूर्वाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. पूर्वाच्या सासुबाईंचे नुकतेच निधन झाले. पूर्वाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशातच तिने तिच्या सासुबाईंच्या आठवणीत काही भावना व्यक्त केल्या आहेत.
या पोस्टमध्ये पुर्वा कौशिक ने लिहीले आहे, "एक नातं जन्माने परिस्थितीने तयार होतं ते रक्ताच नातं त्याला आपण नातेवाईक नाव देतो... हे सर्वसामान्य आहेच... पण एखादं नातं हे आपण नैसर्गिकपणे, समजून उमजून सांभाळतो त्या नात्याला काय नाव द्यायचं हे कधी मुळात मला कळलंच नाही... तसच नातं आहे हे आई तुमचं आणि माझं.... खूप मन भरून आलंय डोकं जड झालंय..... काय बोलावं काय करावं कळत नाहीये...... मग एक जाणवलं तुम्ही आता असं काही झालं असतं तर काय केलं आता तर लिहिलं असतं !.. तर तसचं काहीस वाटतयं... आई मी आयुष्यात खरचं खूप काही चांगलं केलं असावं की तुम्ही आई म्हणून माझ्या आयुष्यात आलात.... २५ शी नंतर माझ्या आयुष्यात नवीन पर्वाला सुरुवात झाली.. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा तुमच्यासारखी स्त्री पाहिली, अनुभवली जी माझी मैत्रिण, आई, सासू बहीण सगळं होतं.. मी खूप कधी व्यक्त झाले नाहीये... माणूस अनुभवाने समृद्ध होत जातो असं म्हणतात. .. " अशा आशयाची पोस्ट पूर्वाने शेअर केली आहे. यासोबत तिने तिच्या सासुबाईंसोबतच्या आठवणी फोटो सुद्धा शेअर केले आहेत.
पूर्वाने यापूर्वीच तिच्या आई-वडीलांना ही गमावलं आहे. झी मराठई अॅवॉर्ड दरम्यान तिने तिच्या आई-बाबांच्या आठवणीत शेअर केल्या. त्यानंतर आता तिच्यावर सासुबाईंच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.