For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा!

08:43 PM Mar 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा
Advertisement

अस्मिता केंद्रे अध्यक्ष तर विलास चाळके उपाध्यक्षपदी बिनविरोध

Advertisement

​रत्नागिरी:

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली असून शिवसेनेने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेच्या 'बाळासाहेब ठाकरे' सभागृहात आज निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदी मंडणगड तालुक्यातील अनुभवी सदस्या अस्मिता केंद्रे यांची, तर उपाध्यक्षपदी देवरुख मधील सदस्य शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत दुपारी १ वाजेपर्यंत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. सोमवारी 16 मार्च रोजी दुपारी ३:३० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी भाऊ गलांडे यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.