For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बीड : शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या

04:15 PM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
बीड   शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या
Advertisement

बीड : दादाहरी वडगाव येथील रहिवासी आणि शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Advertisement

शिवाजीराव शिंदे हे शिवसेनेत तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

त्यानंतर शिंदे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला असून, त्यांच्या आत्महत्येमागील कारणाचा शोध घेतला जात आहे.

Advertisement

दरम्यान, शिवाजीराव शिंदे यांच्या पार्थिवावर दुपारी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. आत्महत्येचे कारण तपासातून स्पष्ट होण्याची शक्यता असून, पोलिसांकडून संबंधित बाबींची चौकशी सुरू आहे.

Advertisement
Tags :

.