For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Municipal Corporation | शिवसेनेचे 'स्वीकृत' फायनल, 'भाजप'मध्ये नियमावर बोट

01:46 PM Feb 11, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur municipal corporation   शिवसेनेचे  स्वीकृत  फायनल   भाजप मध्ये नियमावर बोट
Advertisement

                                कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांसाठी चुरस

Advertisement

कोल्हापूर (कृष्णात पुरेकर ) - महापालिकेच्या 'स्वीकृत नगरसेवकपदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून दोन नावे वरिष्ठांकडे फायनल झाली आहेत. भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी दोन नाये निश्चित असली तरी तिसऱ्या नावावर वरिष्ठ नेत्यांनी नियमावर बोट ठेवल्याने संबंधितांचा पत्ता कट झाला आहे. परिणामी भाजपचे स्वीकृत नगरसेवक यादीतील तिसरा कोण याची चर्चा सुरू आहे.

महापालिकेतील संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकाच्या आठ जागांपैकी भाजपला ३. काँग्रेसला ३ आणि शिवसेना शिंदे गटाला २ जागा वाट्याला आल्या आहेत. महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी, २० रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या सभेतच स्वीकृत नगरसेवकपदासाठी नामनिर्देशन केले जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांकडून नेत्यांकडे लॉबिंग आणि जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यारा राजकारणातील महापालिकेतील काही जुन्या कारभाऱ्यांनाही संधी दिली जाणार आहे.

Advertisement

महापालिका निवडणुकीत उमेदवारासाठी माघार घेतलेल्या तसेच नेत्यांच्या शब्दाला मान दिलेल्यांनास्वीकृत नगरसेवकपदी संधी दिली जाणार आहे. महायुतीत भारतीय जनता पक्षाला स्वीकृत नगरसेवक पदाच्या तीन जागा मिळाल्या आहेत. त्यात भाजपकडून माजी नगरसेवक जयंत पाटील यांचे नाव अंतिम आहे. पण अन्य दोन नावांवर चर्चासुरूच आहेत. यामध्ये काही पराभूत उमेदवारांच्या नावाचीही चर्चा सुरु आहे. त्यांच्याकडून त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे.

माजी जिल्हाध्यक्षांचा पत्ता नियमामुले कट
दरम्यान महायुतीत भाजपचे नेते, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांचे नाव या नियमावर बोट ठेवल्याने आपोआप स्वीकृत नगरसेवकांच्या यादीतून अन् चर्चेतून बाजूला गेले आहे. त्यामुळे भाजपच्या राज्य कार्यकारिणीतील एखाद्या सदस्याला स्वीकृत नगरसेवकपदी संधी देण्याची भूमिका नेत्यांनी घेतल्याचे समजते. दरम्यान, भाजपकडून जयंत पाटील यांचे नाव स्वीकृतसाठी निश्चित आहे. दुसरे नावही निश्चित झाले आहे. पण तिसरा कोण, याची चर्चा सुरू आहे. यामध्ये स्वीकृत म्हणून पक्षातील कोणाला संधी मिळणार, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेकडून प्रसाद चव्हाण, रत्नेश शिराळकर फायनल
शिवसेना शिंदे गटाकडून प्रसाद चव्हाण आणि माजी नगरसेवक रत्नेश शिराळकर यांची नावे फायनल झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही ही नावे अंतिम करण्यात आली आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या दोन नावावरील चर्चा आता पूर्णत्वास पोहोचली आहे.

Advertisement
Tags :

.