Sangli News : बाळेवाडी सोसायटीवर शिवसेनेचा झेंडा
12:56 PM Jun 06, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी विकास सोसायटीवर शिवसेनेने झेंडा फडकविला. सर्व अकरा जागा जिंकत शिवसेना प्रणित पॅनेलने बाळेवाडी सोसायटीवर एक हाती वर्चस्व प्रस्थापित केले.
बाळेवाडी विकास सोसायटीच्या निवडणुकित शिवसेना प्रणित पॅनेल बिरुद्ध भाजप प्रणित पॅनल यांच्यामध्ये चुरशीने सामना झाला. युवा नेते दादाशेठ कचरे, लक्ष्मण कोळेकर, गणपती खरात, काका कोळेकर, जगन्नाथ कोळेकर, दादा कटरे, तानाजी भुते, सुभाष पुकळे, महिला राखीव गटातून संगीता हनमंत यमगर, लक्ष्मीबाई रामचंद्र कारंडे, भटक्या जाती विमुक्त जमाती प्रवर्गातून दादा खताळ हे उमेदवार विजयी झाले.
तिघांना समान मते पडल्याने एक जागा ईश्वर चिट्ठीने शिवसेनेच्याच पारड्यात पडली. शिवसेनेचे युवा नेते दादाशेठ कचरे, श्रीमंत खताळ, सुभाष खरात, लक्ष्मण कोळेकर, आबा भुते, तानाजी कोळेकर, आप्पा कोळेकर, बापू कोळेकर, नाना कटरे, बाबू कोळेकर, रामचंद्र यमगर, दत्तात्रय पुकळे, विश्वास भुते, अनिल खताळ, संजय पुकळे, तानाजी यमगर, विठ्ठल कारंडे यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी एक हाती वर्चस्वासाठी योगदान दिले.
खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, ॲड. विद्याताई मोटे यांनी नूतन संचालकांचा सत्कार केला. सर्वांना सोबत घेऊन शेतकरी सभासदांच्या उन्नतीसाठी बाळेवाडी विकास सोसायटी कार्यरत राहील, असा विश्वास सर्व संचालकांनी व्यक्त केला.
शेतकरी सभासदासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, शेतीपूरक उद्योग व्यवसायाला सहकार्य करणे यासाठी बाळेवाडी विकास सोसायटीला सहकार्य करण्याची ग्वाही आमदार सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, ॲड. विधाताई मोटे यांनी दिली.
Advertisement
Advertisement