For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुडाळ- मालवण मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत   

06:49 PM Nov 04, 2024 IST | अनुजा कुडतरकर
कुडाळ  मालवण मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत   
Oplus_131072
Advertisement

नाईक विरुद्ध राणे कडवी झुंज होणार ; पाच जण रिंगणात

Advertisement

कुडाळ / प्रतिनिधी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून डमी अपक्ष उमेदवार सौ.स्नेहा वैभव नाईक (रा.बिजलीनगर कणकवली) , अपक्ष प्रशांत नामदेव सावंत (किर्लोस गावठाण ता.मालवण) या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी दिली .त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार वैभव विजय नाईक (रा. बिजलीनगर कणकवली) - महायुतीकडून शिवसेनेचे निलेश नारायण राणे (रा.वरवडे कणकवली) -महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून अनंतराज नंदकिशोर पाटकर (रा.हुमरमळा अणाव) - बहुजन समाजवादी पार्टी कडून रविंद्र हरिश्चंद्र कसालकर (रा.कसाल) , रासप कडुन उज्वला विजय येळाविकर (रा. उद्यमनगर कुडाळ) - हे पाच उमेदवार रिंगणात राहिले आहेत.आता मतदार संघात शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे नाईक विरुद्ध राणे यांच्यात कडवी झुंज होणार आहे. 

छाननी नंतर  सात उमेदवार रिंगणात राहिले होते .मात्र , आज दोघांनी अर्ज मागे घेतल्याने पाच उमेदवार रिंगणात राहीले आहेत अंतिम लढत पाच जणांमध्ये होणार आहे.दरम्यान निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले असून आता उद्यापासून मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे

Advertisement

Advertisement
Tags :

.