शिवसेनेच्यावतीने रविवारी शिनोळी फाटा येथे आंदोलन
07:11 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
सीमावासियांना देणार बळ
Advertisement
त. भा. प्रतिनिधी / बेळगाव
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधून हा प्रश्न तातडीने सुटावा म्हणून 1 नोव्हेंबर रोजी काळादिन पाळला जातो. मिरवणूक, निदर्शने, सभा असे कार्यक्रम समितीतर्फे घेतले जातात. परंतु महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये येण्यास बंदी घातली जाते. यासाठीच शिवसेना (उबाठा) पक्षाच्यावतीने शिनोळी फाटा येथे आंदोलन केले जाणार आहे.
Advertisement
शिनोळी फाटा ता. चंदगड येथे निदर्शने करून सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधून घेतले जाणार आहे. या आंदोलनावेळी चंदगड, तसेच सीमाभागातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी केले आहे.
Advertisement
