गोकुळ शिरगाव एमएससीबी वर शिवसेनेचा धडक मोर्चा
गोकुळ शिरगाव प्रतिनिधी
गोकुळ शिरगाव परिसरात बऱ्याच ठिकाणी हाय होल्टेज मोठे डीपी उघडे पडले असून बऱ्याच डीपी जवळ वायर सुद्धा कट झालेले आहेत. हे डीपी अगदी जमिनीला चिकटून असल्यामुळे याचा खूप मोठा धोका असून हे उघडलेले डीपी त्वरित बंद करून घ्यावेत. यासोबतच अनेक तक्रारी घेऊन शिवसेनेने गोकुळ शिरगाव एमएससीबी वर धडक मोर्चा काढला.
यावेळी आजूबाजूच्या जळलेल्या वायरिंगचा सुद्धा बंदोबस्त करण्यात यावा. या डीपीजवळ लहान मुले या परिसरातील शेतकरी आपली जनावरे घेऊन या डीपीच्या शेजारून जात असतात त्यामुळे या डीपीचा वेळीच बंदोबस्त करून डीपी सुरशित करा. असे कित्येक डीपी गोकुळ शिरगाव परिसरात असून ते पूर्णतः व्यवस्थित करूण घ्यावेत. त्याचबरोबर औद्योगिक वसाहत असल्याकारणाने लोक वस्ती झपाट्याने वाढत आहे. ही लोकवस्ती वाढत असताना लोक बांधकाम करतात त्यावेळी एम एस ई बी चा पोल अथवा हाय व्होल्टेज तार याचा कसलाही अंदाज घेत नाहीत.व घर बांधून रिकामे होतात . अशा लोकांच्यावर सुद्धा महावितरणने कारवाई करावी .त्याचबरोबर गोकुळ शिरगाव परिसरातील लाईटची समस्या वारंवार असून या सर्वांचा होणारा नागरिकांचा त्रास त्वरित थांबवावा अशा मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता महावितरण गोकुळ शिरगाव चिवटे यांना देण्यात आले .
यावेळी उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट ,दत्तात्रय पाटील ,दयानंद शिंदे ,विनोद खोत ,शांताराम पाटील, कृष्णात म्हाकवे, अमित कागले, अभिजीत पाटील ,राजू शिंदे, विजय वारके ,दिलीप पाटील, रमेश पाटील सचिन नागटिळक आदीसह शिवसैनिक उपस्थित होते .
फोटो कॅप्शन.. गोकुळ शिरगाव येथील धौकादयक स्तितीत उघड्यावर पडलेले डीपी..