For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : लोणंद मुख्याधिकाऱ्यांविरोधात ठिय्या आंदोलन

06:15 PM Jun 09, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
satara news   लोणंद मुख्याधिकाऱ्यांविरोधात ठिय्या आंदोलन
Advertisement

लोणंद : येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यावर झालेल्या गंभीर भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी त्यांचे तत्काळ निलंबन करून आर्थिक घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी सोमवारपासून ठिय्या आंदोलन छेडण्यात आले आहे. हे आंदोलन शिवसेना नेते संजय नाना जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश पवार, गणेश दणाणे, जमीर शेख, युवराज खरात आदी शिवसेना लोणंद मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या करताना शिवसेना पदाधिकारी, मागणीसाठी ठिय्या आंदोलन लोणंद शहर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.

Advertisement

शहरातील आरोग्यदूत तसेच सर्व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. नगरपंचायतीत विविध विभागातील भ्रष्टाचाराचे आरोप शिवसेनेकडून करण्यात आले आहेत. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, मुख्याधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांच्या हितासाठी व पारदर्शक प्रशासनासाठी हे आंदोलन आहे. जोपर्यंत दोषीदर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.