वेंगुर्लेत शिवसेनेतर्फे उत्पन्न देणाऱ्या वृक्षांचे वृक्षारोपण
आमदार केसरकरांच्या वाढदिवसाचे औचित्य : उमेश येरम यांची संकल्पना
वेंगुर्ले (वार्ताहर)-
राज्याचे माजी शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस वेंगुर्ले तालुक्यात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यात विविध ठिकाणी उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची खास लागवड करण्यात आली.शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांच्या संकल्पनेतुन यावेळी आमदार केसरकर यांनी पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने विकास कामे करताना झाडांची लागवड करण्याच्या केलेल्या सुचनानुसार येथील अग्नीशमन केंद्राकडे वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमेत किरूळकर तसेच जि.प. प्राथमिक शाळा शिवाजी प्रागतिक येथे शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते कल्पवृक्ष (नारळ), आंबा व शेवगा या झाडांचे वृक्षारोपण करण्यात करण्यात आले. शिवाजी प्रागतिक शाळेच्या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनी आमदार दीपक केसरकर यांना गाण्यातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम्, उपजिल्हा प्रमुख सुहास कोळसुलकर, वेंगुर्ला नगरपरीषदेचे मुख्याधिकारी हेमंत किरूळकर, शिवसेनेच्या महिला शहर संघटिका अँड श्रध्दा बावीस्कर-परब, मनाली परब, शबाना शेख, यशवंत किनळेकर, संजय परब, राजू परब, बाळा परब, मनोज पांगम, संजना पिंगुळकर, अंजली शिरोडकर, गणपत केळूसकर, शाळेतील विद्यार्थी नगरपरीषदेचे कर्मचारी उपस्थित होते.