For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवसेना पक्ष येत्या काळात नंबर १ असेल : संजू परब

05:41 PM Mar 20, 2025 IST | अनुजा कुडतरकर
शिवसेना पक्ष येत्या काळात नंबर १ असेल    संजू परब
Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी.

Advertisement

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष येत्या काळात नंबर वन बनवला जाईल. आमदार दीपक केसरकर हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. ते सांगतील त्याप्रमाणेच आम्ही सर्वजण वागणार. आमच्या पक्षात येण्यास अनेक जण इच्छुक आहेत असे नूतन जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. श्री परब यांचे आज सावंतवाडी येथील आमदार दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आले. शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक व संजू परब समर्थक यावेळी उपस्थित होते. श्री परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले आपली ही जिल्हाप्रमुख म्हणून पहिलीच पत्रकार परिषद आहे. मला या मतदारसंघात भरीव असे काम करायचे आहे. आमदार दीपक केसरकर हे आमचे सर्वेसर्वा आहेत. ते जे काय निर्णय घेतील त्यानुसार आम्ही काम करणार आहोत . मात्र आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याचा कुठेही कोणी अपमान केल्यास आम्ही ते सहन करणार नाही आणि अपमान होऊ दिला जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर म्हणाले , संजू परब यांच्याकडे नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे . ही जबाबदारी ते समर्थपणे पेलतील. आता शिवसेनेमध्ये नवीन सभासद नोंदणी सुरू आहे. तिन्ही मतदारसंघात मोठ्या संख्येने सभासद नोंदणी अभियान परब यांच्या नेतृत्वाखाली राबवले जाणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी अशोक दळवी ,नारायण राणे ,गणेश प्रसाद गवस, नितीन मांजरेकर ,बाबू कुडतरकर, राजू निंबाळकर ,गजानन नाटेकर ,नंदू शिरोडकर ,आबा केसरकर ,प्रेमानंद देसाई , अना रोजीन लोबो ,सरपंच सौ सौदागर , सौ. गावकर ,परीक्षित मांजरेकर ,हेमंत बांदेकर ,बंटी पुरोहित विनोद सावंत ,जीवन लाड ,संजय पालकर, सचिन साठेलकर ,श्री प्रभू, लक्ष्मण भालेकर, रवी परब ,संदेश गावडे ,अरविंद परब ,चेतन गावडे, प्रतीक बांदेकर आदी उपस्थित होते

Advertisement
Advertisement
Tags :

.