कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिवसेनेत अस्वस्थता तर भाजपचा विजय संकल्प मेळावा

06:23 AM Sep 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, शिवसेना शिंदे गटात पक्षांर्तगत विधानसभा प्रभारी आणि इतर नियुक्त्या करण्यात आल्या, या नियुक्त्यानंतर पक्षातील इच्छुकांची नाराजी वाढली आहे. त्यातच शिंदे गटात गेलेले उध्दव ठाकरे गटाचे 11 माजी नगरसेवक हे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात परतण्याच्या चर्चेने शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता पहायला मिळत आहे तर दुसरीकडे मुंबई भाजपने चला मुंबईत परिवर्तन घडवूया या टॅगलाईनखाली आज मुंबईत विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन केले आहे. दोन्ही शिवसेनेत आगामी काळात शहा कटशहाचे राजकारण रंगणार असून, पितृपक्षानंतर मुंबईतील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement

 

Advertisement

मुंबई महापालिकेची निवडणूक जशी जवळ येत आहे, तशी दोन्ही शिवसेनेतील मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. उध्दव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष हे मनसेसोबतच्या युतीच्या घोषणेकडे लागले आहे. ठाकरे बंधुच्या युतीच्या घोषणेनंतर अनेक मतदार संघातील राजकीय समीकरणे ही बदलणार आहेत. उध्दव ठाकरे यांच्या गटातील 46 माजी नगरसेवकांना आपल्या गटात घेण्यात शिंदेंना यश आले, मात्र ठाकरे बंधुंच्या युतीमुळे अस्वस्थ झालेल्या 11 नगरसेवकांनी परतीचा प्रयत्न सुरू केला असल्याची चर्चा होती. या 11 नगरेसवकांना रविवारी मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावर बोलावून या नगरसेवकांची समजुत स्वत: शिंदे यांनी काढल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे यांच्या पक्षाने मुंबईतील विधानसभा आणि लोकसभा निहाय प्रभारी विधानसभा प्रमुख आणि संपर्कप्रमुख यांची घोषणा गेल्या आठवड्यात केली. या घोषणेनंतर अनेकजण नाराज असल्याची चर्चा आहे, तर काही विधानसभा मतदार संघातील नियुक्त्या या होल्ड करण्यात आल्या आहेत. मुंबई आणि ठाणे महापालिकांवर शिवसेनेची कायम सत्ता राहीली आहे, ही सत्ता कायम ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेत निकराची लढाई सुरू झाली आहे. शिवसेना फुटीनंतर खरी शिवसेना कोणाची याचा फैसला ना लोकसभा निवडणुकीत झाला ना विधानसभा निवडणुकीत, खरी शिवसेना कोणाची याचा फैसला हा मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीतच होण्याची शक्यता आहे. त्यात मुंबईत आज ही उध्दव ठाकरेंची ताकद ही शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त असल्याचे ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटात जवळपास 46 माजी नगरसेवक दाखल झाले, ठाकरे गटाकडून ठाकरे गटात सर्वात जास्त पक्षांतर हे नाशिक आणि मुंबईत झाले. उध्दव ठाकरेंच्या पक्षाला राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरूंग लावण्यात एकनाथ शिंदे हे यशस्वी झाले. मात्र ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याच्या गेल्या तीन महिन्यातील चर्चेनंतर शिंदे गटात होणारे इनकमिंग थांबले आहे. एकीकडे इनकमिंग थांबलेले असताना दुसरीकडे मात्र कधी नव्हे ते शिंदे गटाकडून आऊटगोइंगची चर्चा सुरू झाली आहे, जर शिंदे गटातून आऊटगोईंग झाल्यास याचे परिणाम शिंदे यांच्या राजकीय इमेजवर होताना, महायुतीतील भाजपसोबतच्या संबंधांवर पण होणार आहे. भाजपकडून आपसुकच शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी होणार आहे, त्यामुळे युती झाल्यास जागावाटपाच्या वाटाघाटी आणि चर्चेवर होऊ शकते.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून मुंबईत विधानसभा विभागप्रमुखांची नियुक्ती करताना अनेक ठिकाणी नाराजी नाट्या पहायला मिळत आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांची कोणतीच मागणी भाजपकडून पूर्ण करण्यात आलेली नाही. मग ते नाशिक आणि रायगड जिह्याचे पालकमंत्री पद असो किंवा मराठा किंवा ओबीसी आरक्षण मंत्रीमंडळ उपसमिती असो, एकनाथ शिंदे यांना या सगळ्यापासून दूर ठेवल्याचे दिसत आहे. 2024 लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमरावती लोकसभा मतदार संघातून भाजपकडून लढलेल्या नवनीत राणा यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे इच्छुक असलेले नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदाराव अडसुळ यांना राज्यपाल करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. नुकत्याच दिल्लीत झालेल्या उपराष्ट्रपती शपथविधी दरम्यान शिंदे यांनी आंनदराव अडसुळ यांना सोबत घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र शहा यांनी भेट दिली नसल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे भाजपला कधी लाडक्या बहीण योजनेसाठी सामजिक खात्याचा निधी वळता केला म्हणून, तर कधी मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या अधिकार आणि कर्तव्यावऊन भाजपवर टीका करणारे संजय शिरसाट, भरत गोगावले, गुलाबराव पाटील आता भाजपच्या विरोधात काही बोलताना दिसत नाही. जे सतत भाजपला आठवण कऊन द्यायचे की शिंदे साहेबांनी उठाव नसता केला तर ठाकरेंची सत्ता गेली नसती आणि भाजपची सत्ता आज राज्यात नसती, तिकडे एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्यात ठाण्यात वनमंत्री गणेश नाईक यांनी शिंदे यांना ललकारले असताना देखील शिवसेनेच्या गोटात शांतता आहे. त्यामुळे भाजपसमोर शिवसेना शिंदे गट हतबल असल्याचे दिसत आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे या दोन्ही पक्षातील नेत्यांचे लक्ष युतीच्या घोषणेकडे लागले आहे तर भाजप महायुती म्हणून लढणार की स्वबळावर लढणार यावर महायुतीतील मित्रपक्षांचे भवितव्य अवलंबून आहे.

भाजपचा आज विजय संकल्प मेळावा

एकीकडे दोन्ही शिवसेनेत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवऊन राजकारण सुरू झालेले असताना दुसरीकडे मुंबई भाजपने मात्र आज वरळी येथे चला परीवर्तन घडवुया असे म्हणत विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन केले आहे. आगामी मुंबई महापालिकेचा महापौर हा भाजपचा बसणार असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. भाजपकडून मुंबईच्या सहा जिह्यातील आढावा बैठकांचा सपाटा लावण्यात आला असून, मुंबईच्या आमदार तसेच नेत्यांवर भाजपने जबाबदारी निश्चित केली आहे. भाजपने आगामी नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मराठी दांडीयाचे विक्रोळीत आयोजन केले आहे. शिवसेना आणि मनसेने मराठी भाषेबाबत मोठा उठाव केला मात्र मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी भाजपच उपक्रम राबवित असल्याचा संदेश भाजपला देत आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article