वेंगुर्लेत शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष ,नगरसेवक उमेदवारांचा घरोघरी प्रचार
ग्रामदेवतांच्या चरणी उमेदवारांच्या विजयासाठी घातले साकडे
वेंगुर्ले (भरत सातोस्कर)-
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेना (शिंदेगट) पक्षातर्फे उमेदवारी भरलेल्या नगराध्यक्ष व १० प्रभागातील २० उमेदवारांच्या घरोघरी प्रचाराचा शुभांरभ जुना एस.टी. स्टॅण्ड येथील गणपती मंदिरातील गणपतीचे दर्शन व दाभोसवाडा येथील विठ्ठलरखुमाईचे दर्शन घेऊन प्रचार प्रमुख सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश उर्फ पिंटू गावडे, शहर प्रमुख उमेश येरम, जिल्हाप्रमुख सुहास कोळसुलकर यांच्या उपस्थित झाला. तत्पूर्वी वेंगुर्ले शहरातील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, श्री देवी सातेरी व कॅम्प ख्यालगिरी येथील स्वामी समर्थांच्या आत्मपादुका मंदिरात साकडे घालण्यात आले नगरपरिषद सार्वत्रिक नवडणुकीकरिता वेंगुर्ले नगरपरिषद शिवसेना (शिंदे गट) पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश उर्फ पिंटू गावडे यांचे सह एकूण १० प - भागातील सर्व २० जागांवर उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहेत. या उमेदवारांच्या घरोघरी निवडणूक प्रचारासाठी वेंगुर्लेवासियांचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर, श्री देवी सातेरी व कॅम्प येथील स्वामी समर्थ आत्मपादुका मंदिरात शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी साकडे घालण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश गावडे, उपजिल्हा प्रमुख सुहास कोळसुलकर यासह १० प्रभागातील २० उमदेवार उपस्थित होते.