For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर यांचा वाढदिवस उत्साहात

02:48 PM Aug 23, 2025 IST | अनुजा कुडतरकर
शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर यांचा वाढदिवस उत्साहात
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

शिवसेनेचे सावंतवाडी शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांचा वाढदिवस शनिवारी त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने माजी आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी आणि त्यांच्या हितचिंतकांनी कुडतरकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. कुडतरकर यांच्या शांत आणि संयमी नेतृत्वाची तसेच सावंतवाडी शहराच्या विकासातील त्यांच्या भरीव योगदानाची प्रशंसा उपस्थित मान्यवरांनी केली.या वाढदिवस सोहळ्याला अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी कुडतरकर यांचे कॉलेजमधील मित्र म्हणून जुन्या आठवणींना उजाळा दिला. "बाबू कुडतरकर शांत आणि संयमी आहेत. शहर विकासासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. मी नगराध्यक्ष असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न मांडले होते. मी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनीच माझे पहिले स्वागत केले होते. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस माझ्या शुभेच्छा आहेत," असे परब म्हणाले.माजी नगराध्यक्ष पल्लवी केसरकर यांनीही बाबू कुडतरकर यांच्या कामाचे कौतुक केले. "शहराच्या विकासासाठी त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. त्यांचे राजकीय भवितव्य बहरत राहो अशी माझी प्रार्थना आहे," असे त्या म्हणाल्या. तसेच, संजू परब यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी काम करून शहराचा नावलौकिक वाढवावा असे आवाहनही त्यांनी केले.माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनीही कुडतरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात बाबू कुडतरकर यांनी आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. "सावंतवाडी नगरपालिका पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात घेण्यासाठी सावध राहून काम करणे गरजेचे आहे," असे ते म्हणाले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस, सावंतवाडी शहर महिला प्रमुख भारती मोरे, स्वप्ना नाटेकर माजी नगरसेविका दिपाली सावंत, शर्वरी धारगळकर, गुरु मठकर, गजानन नाटेकर, शिवसेनेचे विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, राजू निंबाळकर, दोडामार्ग माजी उपसभापती बाळा नाईक, सत्या बांदेकर, सदा कदम, दीनानाथ नाईक, विनोद सावंत, परीक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.