For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Chiplun News : सावर्डे पंचायत समिती गणात शिवसेनेचे उमेदवार युवराज राजेशिर्के मैदानात

04:52 PM Feb 03, 2026 IST | NEETA POTDAR
chiplun news   सावर्डे पंचायत समिती गणात शिवसेनेचे उमेदवार युवराज राजेशिर्के मैदानात
Advertisement

                        सावर्डे गणातील मतदारांपर्यंत पोहोचून युवराज राजेशिर्के यांचे प्रभावी प्रचार

Advertisement

चिपळूण : सावर्डे पंचायत समिती गणातील निवडणूक लढत यावेळी अधिकच रंगतदार होत असताना शिवसेनेने अनुभवी आणि जनाधार असलेले नेतृत्व म्हणून युवराज राजेशिर्के यांना मैदानात उतरवले आहे. राजेशिर्के यांनी यापूर्वी पंचायत समिताच्या उपसभापतीपदी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली असून त्यांच्या कार्यकाळात विकासाभिमुख आणि सर्वसमावेशक निर्णयांची छाप राहिली आहे.

अभ्यासू, संयमी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून युवराज राजेशिर्के यांची ओळख आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी जवळीक, प्रश्नांची जाण आणि प्रशासनाचा अनुभव यामुळे त्यांची उमेदवारी शिवसेनेसाठी ताकदीची मानली जात आहे. ग्रामविकास, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य आणि युवकांसाठी संधी निर्माण करण्यावर त्यांचा भर राहणार आहे. विकास हा केवळ घोषणा नाही तर तो प्रत्यक्ष कृतीतून दिसला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे. मतदारांपर्यत पोहोचून ते आपली भूमिका प्रभावीपणे मांडत आहेत. त्यामुळे सावर्डे गणात शिवसेनेच्या प्रचाराला वेग आलेला असून येथील लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

Advertisement

शिवसेनाया ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या ध्येयानुसार राजेशिर्के यांची नेहमीच वाटचाल राहिली आहे. यापूर्वी २००३ मध्ये राजेशिर्के यांनी या गणातून पंचायत समितीवर निवडून गेल्यानंतर उपसभापतीपदी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्याचबरोबर काहीकाळ सभापतीपदावरही काम केले आहे. शांत आणि संययी व्यक्तिमत्व म्हणून राजेशिर्के यांना या भागात ओळखले जाते. एकूणच समाजकारण आणि राजकारणातील त्यांचा अनुभव, अभ्यास आणि कार्यकर्त्यांचा विश्वास या त्रिसूत्रीवर शिवसेनेचे उमेदवार युवराज राजेशिर्के हे सावर्डे पंचायत समिती गणात निवडणुकीला सामोरे जात असून मतदारांचाही त्यांना भक्कम पाठिंबा मिळत आहे.

Advertisement
Tags :

.