For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवप्रतिष्ठानतर्फे तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा थाटात

06:48 AM Jun 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
शिवप्रतिष्ठानतर्फे तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा थाटात
Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव :  हिंदू तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच शनिवारी मोठ्या थाटात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी उद्यान येथे सकाळी शिवमूर्तीला विधिवत दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालण्यात आला. या निमित्ताने सायंकाळी दिमाखात देवदर्शन यात्रा काढण्यात आली. ध्वजपथक, वारकरी दिंड्या यांचा सहभाग असल्याने शेकडोंच्या संख्येने शिवप्रेमी यामध्ये सहभागी झाले होते.

शिवप्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, तसेच शहरप्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून हार घालण्यात आला. महिलांच्यावतीने आरती करण्यात आली. यावेळी तिथीनुसार शिवराज्याभिषेक  सोहळा साजरा करण्यामागचा उद्देश धारकऱ्यांना सांगण्यात आला.

Advertisement

सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी उद्यान ते कपिलेश्वर मंदिरापर्यंत भव्य देवदर्शन यात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये अश्वपथक, ध्वजपथक, वारकरी दिंड्या, पालखीपथक, शिवछत्रपतींची मूर्ती व धारकरी सहभागी झाले होते. ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने धारकरी सहभागी झाले होते.

Advertisement
Tags :

.