For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवप्रतिष्ठानतर्फे धारकऱ्यांसाठी भंडाऱ्याचे आयोजन

12:57 PM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
शिवप्रतिष्ठानतर्फे धारकऱ्यांसाठी भंडाऱ्याचे आयोजन
Advertisement

बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्यावतीने भंडारा म्हणजेच तुळजा भवानीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. नुकत्याच पार पडलेल्या लोहगड ते भीवगडमार्गे राजमाची व एकवीरा आई अशा मोहिमांमध्ये सहभागी झालेल्या धारकऱ्यांच्यावतीने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले रोड येथील मराठा सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला ईश्वरपूर येथील शिवप्रतिष्ठानचे सरसेनापती अशोकराव वीरकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत राजारामबापू साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वासराव पाटील उपस्थित होते. प्रेरणा मंत्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. अशोकराव वीरकर यांनी मोहीम कशासाठी? या विषयी सखोल मार्गदर्शन केले. कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी येणारा बलिदान मास प्रत्येक गल्लोगल्ली व गावपातळीवर आचरण्यात यावा, अशी सूचना केली. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख आनंद चौगुले, तालुका प्रमुख परशुराम कोकीतकर, हिरामणी मुचंडीकर, पुंडलिक चव्हाण, किरण बडवाण्णाचे, प्रमोद चौगुले, प्रफुल्ल शिरवलकर, तुकाराम पिसे, चंद्रशेखर चौगुले यासह शेकडो धारकरी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.