महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उचगाव शाखेतर्फे शिवकालीन युद्धकला शिबिर उत्साहात

10:31 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /उचगाव

Advertisement

येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उचगाव शाखेच्यावतीने शिवकालीन युद्धकला व संरक्षण शिबिर, लाठी, भाला, रणवार, भारतीय व्यायाम, यातील धारकरी व  रणरागिणी यांना शिवचरित्रावर आधारित प्रŽमंजुषा स्पर्धा मळेकरणी देवस्थान उचगाव येथे इचलकरंजी येथील व भिडे गुऊजींच्यासोबत सतत असणारे आणि ‘स्वच्छता  दूत’ म्हणून ओळखले जाणारे महाजन गुऊजी यांच्या उपस्थितीत या स्पर्धा पार पडल्या. गावातील सर्व धारकरी, रणरागिणी आणि परिसरातील शिवभक्त, नागरिक, युवक यावेळी उपस्थित होते. या प्रŽमंजुषा स्पर्धेत 70 विद्यार्थी, विद्यार्थिनींनी भाग घेतला होता.

Advertisement

यावेळी महाजन गुऊजी म्हणाले की, आजचे युगे धावपळीचे असून यामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनींनी, युवकांनी योग्य तो मार्ग निवडून जीवनाची वाटचाल केली पाहिजेत. कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाता तसेच वाईट कृत्य, मार्गाला न लागता आपण एक चांगला मनुष्य बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कुठेही कलंक लागेल, अशी कोणतीही वाईट गोष्ट अथवा घटना केली नाही. त्यांचेच अनुकरण सर्वांनी करावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उचगाव प्रमुख नेहाल जाधव यांनी स्वागत केले. तर या स्पर्धेसाठी यशवंत तरळे, यशराज मन्नूरकर, साई पावशे, अथर्व जाधव, संदीप तरळे, उमेश मेणसे, शुभम लोहार, मिथील जाधव, प्रज्ज्वल गोंधळी, गजानन कोवाडकर आदी यावेळी उपस्थित राहून या स्पर्धा पार पाडण्यासाठी सहकार्य केले. या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विजयी स्पर्धकांना सोमवार 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून पारितोषिके देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article