For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्यापीठात रंगणार शिव-महोत्सव

11:56 AM Mar 09, 2025 IST | Radhika Patil
विद्यापीठात रंगणार शिव महोत्सव
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज (दि. 9) दुपारी 4 वाजता ‘शिव महोत्सव‘ होणार आहे. शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. अशी माहिती शिवाजी विद्यापीठ आजी-माजी स्नेहमेळावा कृती समितीचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. प्रविण कोडोलीकर, मुख्य समन्वयक अॅड. मंदार पाटील यांनी दिली.

शिव महोत्सव‘चे 20 वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे महोत्सवांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा, शिव पुरस्कार वितरण व भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. शिवमहोत्सवात यंदाचा जीवनगौरव पुरस्कार दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच आमदार राजेश क्षीरसागर, सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्त्या विद्याताई पोळ, कोल्हापूर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. धनराज नाकाडे, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा संचालक डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. प्रियांका धनवडे, डॉ. सरदार जाधव, विवेकानंद शिक्षण संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, केशव गोवेकर ,मिलिंद सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सारेगमप फेम गायक राहुल सक्सेना, गायिका मधुरा कुंभार, लोकशाहीर रणजित आशा अंबाजी कांबळे आणि सँड आर्टिस्ट अमित माळकरी यांचे सादरीकरण प्रमुख आकर्षण असेल.

Advertisement

डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांचा शिवसोहळा, श्रीजा लोकसंस्कृती फाऊंडेशन (नृत्यदिग्दर्शक चंद्रकांत पाटील) आणि रिव्हॉल्युशन डान्स अॅकेडमी (नृत्यदिदर्शक रोहित पाटील) यांचा नृत्याविष्कार पाहावयास मिळणार आहेत. शिव महोत्सव यशस्वि करण्यासाठी अभिजीत राऊत, अजिंक्य शिंदे, प्रवीण साळुंखे, ओंकार शेट्यो, महेश राठोड, पृथ्वीराज घोडके, अक्षय देसाई आणि कृती समिती सदस्य परिश्रम घेत आहेत.


Advertisement
Tags :

.