शिवजयंती मंडळांची उद्या बैठक
12:47 PM Apr 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या नेतृत्वाखाली यावर्षीही पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. बेळगावची शिवजयंती ऐतिहासिक शिवजयंती म्हणून ओळखली जाते. नाविन्यपूर्ण देखावे, ढोलताशा, तसेच शिवचरित्रावर आधारित प्रसंग सादर करण्यात येतात. शिवजयंतीचे नियोजन करण्यासाठी मंगळवार दि. 15 रोजी सायंकाळी 5.30 वाजता धर्मवीर संभाजी चौक परिसरातील जत्ती मठ येथे बैठक होणार आहे. यावेळी सर्व शिवजयंती उत्सव मंडळांनी उपस्थित राहून आपल्या सूचना मांडाव्यात, असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी, सेक्रेटरी विजय पाटील यांनी केले आहे.
Advertisement
Advertisement