For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खैरवाड येथे शिवजयंती साजरी

10:00 AM May 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
खैरवाड येथे शिवजयंती साजरी
Advertisement

खानापूर : खैरवाड येथे नव्याने उभारलेल्या शिवस्मारकात ग्रामस्थांच्यावतीने पारंपरिक शिवजयंतीनिमित्त शिवजन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे 5.30 वाजता अभिषेक घालून शिवाजी महाराजांची मूर्तीची विधीवत पूजा करण्यात आली. यानंतर सकाळी 7 वाजता शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी  पाळणागीत म्हटले. सायंकाळी 7 वाजता शिवजयंतीनिमित्त सुदर्शन दास प्रभू बेळगाव यांचे व्याख्यान झाले. संपूर्ण कार्यक्रमास खैरवाड ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी झाले हेते.

Advertisement

Advertisement
Tags :

.