For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भोसले नॉलेज सिटीत 'शिवजयंती ' उत्साहात

04:35 PM Feb 19, 2025 IST | अनुजा कुडतरकर
भोसले नॉलेज सिटीत   शिवजयंती   उत्साहात
Advertisement

पोवाडे, नामघोष व सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण चैतन्यमय

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावरून आलेल्या शिवज्योतीचे स्वागत संस्थेच्या प्रवेशद्वारावर करण्यात आले. त्यानंतर कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले व सचिव संजीव देसाई यांच्या हस्ते शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अध्यक्षा ऍडव्होकेट अस्मिता सावंतभोसले, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, सर्व प्राचार्य, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement

विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि लेझीम नृत्य करत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. भोसले इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थिनींनी पोवाडे व भाषण करत महाराजांना मानवंदना दिली. वायबीआयएस प्री-प्रायमरी विभागातील चिमुकल्यांनी आकर्षक वेशभूषा साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी गोंधळी नृत्यही सादर करण्यात आले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या नामघोषाने संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला होता.

Advertisement
Tags :

.