For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती

05:46 PM Feb 19, 2026 IST | अनुजा कुडतरकर
ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती
Advertisement

माजी आमदार वैभव नाईकांनी मूर्तीस जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून घेतले दर्शन

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगव्या शाली,भगवे झेंडे, भगवे फेटे, परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज कि जय! जय भवानी,जय शिवाजी! चा जयघोष करीत, लेझीम नृत्य आणि ढोल ताशाच्या गजरात किल्ल्यावर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी छत्रपतींच्या मूर्तीस जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले व जिल्हावासीयांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे देशातील एकमेव ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिर असून शिवसेनेच्या वतीने दरवर्षी याठिकाणी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून या मंदिराचे नूतनीकरण व मंदिरात आकर्षक असे दगडात कोरलेले सिंहासन उभारण्यात आले आहे. शिवराजेश्वर मंदिरात दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. याप्रसंगी पुजारी श्री. सकपाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, शहरप्रमुख बाबी जोगी, प्रा. मंदार सावंत, नितीन राऊळ, किल्ला रहिवाशी मंगेश सावंत, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, तळगाव सरपंच लता खोत,रेवंडी सरपंच अमोल वस्त, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत,नगरसेविका अनिता गिरकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, अमित भोगले, महिला शहरप्रमुख रश्मी परुळेकर, राहुल सावंत,उदय दुखंडे, सचिन रेडकर,संजना रेडकर,कृष्णा आंगणे,दिनेश चव्हाण, गौरी मयेकर, राधिका मोंडकर, माधुरी प्रभू, मनोज मोंडकर,हेमंत मोंडकर,उमेश मांजरेकर, महेश शिरपुटे, निलेश दुधवडकर, साक्षी कोंडरकर, राजू मेस्त्री, भावेश कांबळी, संजय कांबळी,सिद्धेश मांजरेकर, राजू नार्वेकर, महेश शिरपुटे, रूपा कुडाळकर, बाप्पा वायंगणकर, किशोर गावकर,चिंतामणी मयेकर,गजा नेवाळकर,प्रत्यूश भोगले, संतोष अमरे,सोनाली डिचवलकर,बबन वाघ,निलेश केळुसकर,आबा केळुसकर,रवी तळाशिलकर,स्वप्नील आचरेकर, समीर लाड, गजा नेवाळकर,राका रोगे,राहुल जाधव, कल्पेश रोगे, नारायण कुबल, सुनील माळकर,सुधाकर वायंगणकर, चंद्रकांत घाडीगावकर, विलास तांडेल अमृता मयेकर, विजया तांडेल, संतोष सावंत,बबन दुखंडे,बाबल पडवळ,सुरज आचरेकर,दिनेश कांबळी,मेघना कांबळी, अनिरुद्ध पोयरेकर,प्रशांत कांबळी, गणेश घोगळे,संतोष कांबळी,शौर्या कांबळी, दत्ता पोईपकर,अरुण परब आदींसह किल्ला रहिवाशी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.