तिरोडा येथे उद्या 'शिवभक्त शबर' दशावतारी नाट्यप्रयोग
श्री देव पाटेकर महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
सावंतवाडी /प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा येथील श्री गुरुदेव पाटेकर पंचायतनाच्या वतीने सालाबादाप्रमाणे माघ शु. षष्ठी सोमवार दि. ०३ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री देव पाटेकर महाराज वाढदिवस व श्री देव दत्ताजीराज प्रतिस्थापना वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ यांचा 'शिवभक्त शबर' या नाटकाचा प्रयोग रात्रौ ८ वाजता होणार आहे. त्यापूर्वी श्री देव भवानीशंकर महाराज यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे. दुपारी १ ते २ महाप्रसाद,सायं ४ वा. पासून तीर्थप्रसाद ,दुपारी ३.३० ते ४.३० : श्री देव पाटेकर तरुण मंडळाचे भजन,सायं ६.३० ते ७ वा. : फटाक्यांची आतिशबाजी,सायं ७ ते ७.३० : देवस्थानच्या वतीने सत्कार समारंभ,श्री देव भवानी शंकर महाराज मार्गदर्शन रात्रों ८. वा. : देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर कंपनीचे दशावतारी नाटक : 'शिवभक्त शबर' श्री देव पाटेकर पंचायतन देवस्थान पटांगण तिरोडा, खासेवाडी ता. सावंतवाडी, येथे हा कार्यक्रम होईल. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त भोंसले कुटुंबिय तसेच श्री देव पाटेकर तरुण मंडळ व ग्रामस्थ, खासेवाडी, तिरोडा यांनी केले आहे.