For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Shirol News | शिरोळच्या कन्येची मोठी झेप; शांभवी माळकर १२ वी परीक्षेत ९४% गुणांसह केंद्रात पहिली!

12:34 PM May 03, 2026 IST | NEETA POTDAR
shirol news   शिरोळच्या कन्येची मोठी झेप  शांभवी माळकर १२ वी परीक्षेत ९४  गुणांसह केंद्रात पहिली
Advertisement

                           कोल्हापूर विभागात शिरोळ केंद्रात प्रथम

Advertisement

शिरोळ - शिरोळची  सुकन्या कु. शांभवी श्रीकांत माळकर हिने मार्च २०२६ मध्ये  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या  इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ६०० पैकी ५६४ म्हणजे तब्बल ९४% गुण प्राप्त करून कोल्हापूर विभागातील शिरोळ केंद्रात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला. 

१२ वी कला शाखेत शिकणाऱ्या कु. शांभवी माळकर हिने १० वी च्या परीक्षेतही ९६.४०% गुण मिळवून  उत्तुंग यश संपादन केले होते. १२ वी परीक्षेत ९४% गुण प्राप्त करून प्रथम आलेल्या शांभवीला महाविद्यालयातील सर्व शिक्षक व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल  रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी, विजयसिंह शिक्षण प्रसारक मंडळ, शिवस्फुर्ती व्याख्यानमाला समिती ,राधा महिला सोशल फाउंडेशन ,स्व -परिवर्तन फाउंडेशन,  व्हिजन आयडॉल्स करिअर & सेल्फ डेव्हलपमेंट अकॅडमी अशा शिरोळ व पंचक्रोशीतील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी कु. शांभवी माळकर हिचे विशेष अभिनंदन केले आहे.

Advertisement

कु. शांभवी ही सुप्रसिद्ध व्याख्याते ॲड. प्रा. श्रीकांत माळकर यांची सुकन्या व युवा वक्त्या प्रज्ञा माळकर यांची भगिनी असून महाराष्ट्रातील अनेक नामांकित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतही तिने उत्तुंग यश संपादन केले आहे.

Advertisement
Tags :

.