पंचगंगा नदीशेजारी दर्ग्याजवळ उड्डाणपुलाची मागणी; खासदार धैर्यशील माने यांनी केली पहाणी
पुलाची शिरोली / वार्ताहर
पंचगंगा नदीशेजारी दर्ग्याजवळ उड्डाणपुल व छत्रपती शिवाजी नगर कमानी जवळ भुयारी मार्ग ठेवावा. याबाबतचे निवेदन शिरोली ग्रामपंचायत व नागरीकांनी खासदार धैर्यशिल माने यांना देण्यात आले. यानुसार खासदार माने यांनी मंगळवारी सायंकाळी स्पॉटला भेट दिली.
सध्या पूणे बंगलूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या महामार्गामुळे शिरोलीचे पूर्व-पश्चिम असे दोन भाग झाले आहेत. पूर्वेला सुमारे पंधराशे व पश्चिमेला सुमारे पंधराशे एकर शेतीचे क्षेत्र आहे. या महामार्गावर शेतातील ऊस वाहतूक करण्यासाठी मोठा बोगदा अथवा उड्डाणपुलठेवण्यात आलेला नाही. तसेच छत्रपती शिवाजी नगरमधील नागरीकांना प्रत्येक कामासाठीगावात ये-जा करावी लागते. दवाखाना, शाळा, शासकीय कार्यालये, बँका, सहकारी संस्था, दुकाने हे सर्व महामार्गाच्या पश्चिम दिशेला आहेत. यासाठी नागरिक, रुग्ण व विद्यार्थ्यांना मोठी पायपीट करावी लागणार आहे. परिणामी हा प्रवास त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे तेथे भुयारी मार्गाची आवश्यकता आहे. अशी दोन मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
यावेळी माजी जि.प. सदस्य महेश चव्हाण, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतिश पाटील, प्रकाश कौंदाडे, दिपक यादव, महमद महात, आरीफ सर्जेखान, योगेश खवरे, धनाजी पाटील, सुरेश यादव, हिदायत्तुल्ला पटेल, एकनाथ पाटील,संपत संकपाळ,सचिन संदीप शिंदे, व पदाधिकारी