पंधरा दिवसात लोकसभा मतदार संघ भगवामय होणार : खास. धैर्यशील माने
शिरोलीत उत्साहात स्वागत , भरघोस मताधिक्य देण्याची ग्वाही
शिरोली / प्रतिनिधी
शिरोली गाव स्वाभिमान जपणारे गाव आहे . येत्या पंधरा दिवसात संपूर्ण लोकसभा मतदार संघ भगवामय होणार आहे. शिरोली ते नृसिंहवाडी पर्यंतच्या पंचगंगा नदी काठावरील प्रत्येक गावात एसटीपी प्लॅन्ट उभे करून नदी प्रदुषण मुक्त करण्यात येईल. शिरोली ते सांगली नॅशनल हायवेच्या रस्त्यासाठी 800 कोटी रुपये निधी लावला आहे. तसेच भविष्यकाळात मतदार संघात दहा हजाराची गुंतवणुक करून तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योग उभे केले जाणार आहेत . तरी बहुमताने विजयी करण्याचे आवाहन खास धैर्यशील माने यांनी केले . शिरोली (ता .हातकणंगले) येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ ते बोलत होते .
खास. माने पुढे म्हणाले , शिरोली गावात मागील दोन-अडीच वर्षामध्ये 2 कोटी 26 लाखाची विकासकामे केलेली आहेत. देशाच्या कोणत्याही योजनेत पंतप्रधान मोदी यांनी जात ,धर्म, पंत बघितलेला नसून राष्ट्र धर्म पाळला आहे .
संवाद बैठकीत कृष्णात करपे, विठ्ठल पाटील, सुरेश पाटील, सतिष पाटील यांनी मनोगते व्यक्त करून प्रंचड मताधिक्य देण्याची ग्वाही दिली. बैठकीस दिलीप पाटील, राजेश पाटील, संजय पाटील, अविनाश बनगे , शिवाजी समुद्रे, बापु पुजारी, हिदायततुल्ला पटेल, विजय जाधव, बाळासो पाटील, विनायक यादव, अविनाश कोळी, दीपक यादव, संदेश शिंदे, विनायक यादव, शिवाजी मोहिते, संदीप तानवडे, सचिन गायकवाड, सागर कौंदाडे, विजय जाधव, श्रीकांत कांबळे, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब पुजारी, बाबासाहेब बुधले, प्रशांत कागले, निवास कदम, चंद्रकांत जाधव, मनीष समुद्रे, सचिन समुद्रे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. सुत्रसंचलन अजित देशपांडे यांनी केले.
सुरवातीला हनुमान मंदिरात दर्शन घेवून छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भगवान शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे दर्शन घेतले.
यावेळी माजी सरपंच बाबासाहेब कांबळे ,प्रकाश कौंदाडे, बाबासो यादव, माजी सरपंच अनिल शिरोळे, संजय पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.