महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिरोळची कन्या पै. अमृता पुजारी हिला आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेचे नेतृत्वाची संधी प्राप्त

11:46 AM Jun 14, 2024 IST | Abhijeet Khandekar
Amrita Pujari
Advertisement

शिरोळ प्रतिनिधी

शिरोळची कन्या महिला महाराष्ट्र केसरी किताब मिळवणारी पैलवान अमृता शशिकांत पुजारी हिची आंतरराष्ट्रीय  कुस्ती स्पर्धेत 72 किलो वजनी गटात 23 वर्षाखालील आशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे .प्रथमच शिरोळ गावाला नेतृत्व करण्याची संधी अमृता पुजारीच्या रूपाने मिळाल्याने शहरात फटाक्याची आतषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला .

Advertisement

पै. अमृता पुजारी ही लहानपणापासूनच कुस्तीची आवड असल्याने अनेक छोट्या मोठ्या  कुस्त्या खेळल्या आहेत अनेक पारितोषिकही मिळवले आहेत.  नुकताच तिला महिला महाराष्ट्र केसरी किताब मिळाला आहे.

Advertisement

घरची परिस्थिती  बेताची असतानाही तिचे वडील शशिकांत पुजारी यांनी तिला प्रोत्साहन दिले. आशियाई चॅम्पियन स्पर्धेत  नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पैलवान अमृता पुजारी ही सध्या मुरगुड येथील कै सदाशिवराव मंडलिक आखाडा येथे सराव करीत आहे.

Advertisement
Tags :
Amrita PujariAsian Champions Tournamentshirol
Next Article