For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

प्रेमविवाहाचा करुण अंत! नवीन घरासाठी ‘माहेरून पैसे आण’ म्हणत छळ; कथित छळाला कंटाळून 24 वर्षीय विवाहितेने केली आत्महत्या; पतीसह सासू-सासरे अटक

04:23 PM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रेमविवाहाचा करुण अंत  नवीन घरासाठी ‘माहेरून पैसे आण’ म्हणत छळ  कथित छळाला कंटाळून 24 वर्षीय विवाहितेने केली आत्महत्या  पतीसह सासू सासरे अटक
Advertisement
सांगली : प्रेमविवाहानंतर सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळाला कंटाळून 24 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात घडली आहे. पूजा शिवम पाटील असे मृत विवाहितेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीसह सासू आणि सासऱ्याला अटक केली आहे.

पूजा ही शिराळा तालुक्यातील पाडळी येथील रहिवासी होती. तिने शिवम सुरेश पाटील याच्याशी प्रेमविवाह केला होता. मात्र, विवाहानंतर काही दिवसांतच तिचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. लग्नात योग्य मानपान केले नसल्याचे सांगत तसेच नवीन घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा दबाव तिच्यावर टाकण्यात येत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement

या सततच्या कथित छळाला कंटाळून पूजाने 22 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत ती गंभीर भाजली होती. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पूजाचे वडील रवींद्र शामराव शिंदे (वय 57, रा. शिराळा) यांनी शिराळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवम सुरेश पाटील (पती), सुमित्रा सुरेश पाटील (सासू) आणि सुरेश खंदू पाटील (सासरा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Advertisement

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रकरणाचा पुढील तपास शिराळा पोलिस करीत आहेत.

Advertisement
Tags :

.