For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणहून आलेले जहाज जप्त

12:03 PM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
इराणहून आलेले जहाज जप्त
Advertisement

मास्टर अमीर बोन्यादी पोलिसांच्या ताब्यात : भारतीय सागरी क्षेत्रात बेकायदा प्रवेश,बंदी असलेल्या सॅटेलाईटचा केला वापर

Advertisement

पणजी : भारतात बंदी असलेल्या थुराया सॅटलाईट फोनचा वापर करणाऱ्या इराणी संशयिताविरोधात वास्को हार्बर किनारी पोलिसांनी वायरलेस टेलिग्राफी अधिनियम 1933 आणि भारतीय टेलिग्राफ कायदा 1885 च्या कलम 20 आणि 21 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. याबाबत कस्टमचे सहाय्यक आयुक्त (पी), कस्टम हाऊस, हरेश्वर एस. खडविलकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्याचे जहाज जप्त करण्यात आले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमीर बोन्यादी ई. के. (इराणी राष्ट्रीय जहाजाचा मास्टर) असे त्याचे नाव आहे. तो एम. व्ही. एमआयएएमआय प्राईड  9274941/422088700 क्रमांकाचे जहाज घेऊन इराण येथील अब्बास बंदर येथून आला आहे. त्याने भारतीय प्रादेशिक पाण्यात (अरबी समुद्रात) प्रवेश केला होता.

बंदी असलेला सॅटेलाईट

Advertisement

या जहाजावर सुमारे आठ मीटर उंचीचा टॉवर होता. (मार्किंग : थुराया प्रमाणित उत्पादन), मॉडेल क्रमांक एमएनबी-01-बीडीयु बारकोड क्र. बीडीयु 01 आयएएल 007281 बेअरिंग सॅटेलाइट फोन नंबर 88-1623127629 आएमईआय क्र. 358876-10-420017-6 या फोनचा बेकायदेशीरपणे वापर करीत होता. वास्तविक भारतीय प्रादेशिक पाण्याच्या क्षेत्रात या सॅटेलाईटचा वापर करण्यास बंदी आहे.

अनेक दिवसांपासून अरबी समुद्रात

हा संशयित 3 एप्रिलपासून अरबी समुद्रात भारतीय प्रादेशिक क्षेत्रात कार्यरत होता. याबाबत केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला माहिती मिळाल्यानंतर त्याबाबत गोवा सरकारला कळविण्यात आले होते. त्यानंतर गोवा कस्टम विभागाने या जहाजाचा शोध घेतला असता सदर जहाज मुरगाव येथे खोल समुद्रात असल्याचे आढळून आले. कस्टम अधिकाऱ्यांनी हार्बर किनारी पोलीस स्थानकाला याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी पुढील कारवाई केली. संशयिताने बंदी असलेल्या सॅटेलाईट फोनचा वापर कशासाठी केला आणि त्यांनी कोणती माहिती, कोणाला पाठविली त्याबाबत किनारी पोलीस तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.