Dharashiv Politics News | जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीपूर्वी शिंदेंची भेट; धाराशिवच्या राजकारणात खळबळ
धाराशिवच्या राजकारणात हालचाल
धाराशिव उमरगा - धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, माजी आमदार ज्ञानराज चौगुले आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
या बैठकीत जिल्ह्यातील शिवसेना एकसंघ आणि अभेद्य असल्याचा संदेश देण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो निर्णय सर्वांना मान्य असेल, असे या सर्व नेत्यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, यापूर्वी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या गटाला बाजूला ठेवून भारतीय जनता पक्षाच्या मदतीने भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसवण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. तसेच शिवसेनेत दोन गट पडल्याच्या बातम्याही समोर येत होत्या.या पार्श्वभूमीवर काल झालेली ही बैठक जिल्ह्यातील राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.