For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महायुतीचे उबाठा शिवसेनेला धक्क्यावर धक्के

02:38 PM Jan 24, 2026 IST | अनुजा कुडतरकर
महायुतीचे उबाठा शिवसेनेला धक्क्यावर धक्के
Advertisement

जानवली जिल्हा परिषदमधून शिंदे शिवसेनेच्या रुहिता तांबे बिनविरोध

Advertisement

कणकवली / प्रतिनिधी

महायुतीने कणकवली तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. जानवली जिल्हा परिषद मतदार संघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार हेलन कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे जाणवली जिल्हा परिषदमधून शिंदे शिवसेनेच्या उमेदवार रुहिता तांबे यांची बिनविरोध निवड झाली आहे.तालुक्यात बिडवाडी पंचायत समिती मधून उबाठा शिवसेनेच्या उमेदवार विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरल्याने तेथून भाजपच्या संजना राणे यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर वरवडे पंचायत समिती मधून उबाठा शिवसेनेचे उमेदवार सुधीर सावंत व मनसेचे उमेदवार शांताराम सादये यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजप उमेदवार राजेश उर्फ सोनू सावंत यांची ही बिनविरोध निवड झाली होती. उबाठाच्या खारेपाटण जि प उमेदवार मीनल तळगावकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजप उमेदवार प्राची इस्वलकर त्यांची बिनविरोध निवड झाली. त्या पाठोपाठ आता महायुतीने उबाटा शिवसेनेला जाणवली मधून आणखी एक धक्का दिला आहे. त्यामुळे 27 तारीखला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पालकमंत्री नितेश राणे अजून काय धक्के देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.